Thursday, October 10, 2013

“मैत्री” धडक मोहिम, २०१३


          “घाणाया चिखलदरा तालुक्यातील दुर्गम गावात चार वर्षाच्या सुभाष रामदास सावलकर या मुलाचा सर्पदंशाने मृत्यु झाला. मेळघाटात एक बालमृत्यू अजुन झाला.       पण यानंतर मात्र आठ गावात मैत्रीने धडक मोहिम सुरु केली आणि एकही बालमृत्यू होऊ दिला नाही. मेळघाटातील अतिदुर्गम आठ गावात (चुनखडी,खडीमल,नवलगाव,घाणा,लाखेवाडा,बोदु,चोबिता,बिबा) स्वयंसेवकांच्या मदतीने दररोज गावातील मुलांच्या आरोग्याची आणि आवश्यकतेप्रमाणे उपचाराची जbaaबाबदारी मैत्रीच्या स्वयंसेवकांनी उचलली.          यावर्षी मैत्रीची धडक मोहिम १९ जुलै ते ५ ऑक्टोबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आली. याच कालावधीत मेळघाटातील आजारांचे आणि पर्यायाने बालमृत्यु होण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे या काळात गावात आरोग्य सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असते. धडक मोहिमेत स्वयंसेवकांच्या मदतीने यासाठी प्रयत्न करण्यात आला.          या काळात अनेक वेळा बालमृत्यू होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. पण वेळीच उपाययोजना केल्याने असे होऊ शकणारे अनेक बालमृत्यू आम्ही वाचवू शकलो. ही यादी खुप मोठी आहे. काही प्रातिनिधिक उदाहरणे येथे देत आहोत.. चुनखडी या गावातील करण अर्जन धिकार हे १५ महिन्यांचे बाळ. वजन ७ किलो. तीव्र कुपोषित. अशातच त्याला गंभीर निमोनियाची लागण झाली. धडक मोहिमे दरम्यान अनेक वेळा सांगुनही पालकांनी दवाखान्यात (चुर्णी येथील ग्रामीण रुगणालयात) नेण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ.आशिष चांगोले या मैत्री च्या स्वयंसेवकाने त्यावर घरीच उपचार सुरु ठेवले. नियमितपणे घरी जावुन त्या बाळाची काळजी घेतली. अगदी रात्री सुद्दा. बाळ आता ठिक आहे. वजनातही वाढ होत आहे.२.खडीमल या गावातील बाली सुभाष सावलकर या गरोदर महिलेच्या अंगावर सुज होती. तिला तीव्र रक्तक्षय. हिमोग्लोबिन अवघं ३.५ mg भरले. तिची वेळेअधीच (नऊ महिने पुर्ण होण्याआधीच) डिलिवरी झाली. खुप रक्तस्त्राव झाला. बाळाचे फक्त वजन १.८००किलो भरले. घटना २२ सप्टेंबर,२०१३ या दिवशी घडली.          सुदैवाने त्याच दिवशी धडक  मोहिमेत आलेल्या स्त्रीरोगत डॉ.प्र झरकर याच गावात आल्या. त्यांनी आईची आणि बाळाची नाजुक अवस्था बघुन काही प्राथमिक उपचार केले. पण कोणत्याही परिस्थितीत तिला दवाखान्यात घेवुन जाणे.भागच होते.तेथुन कांटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात फोन करुन गाडी बोलावली. गाडी येईपर्यंन्त डॉक्टरांनी उपचार सुरु ठेवले. नंतर तिला दवाखान्यात भरती केले. आता दोघेही सुखरुप आहेत. बाळाचे वजनही वाढत आहे.३.बिबा या गावातील हेमराज रघु चिमोटे नावाचं बाळ जेंव्हा जन्मलं तेंव्हा ३.५ किलो भरलं.बाळ खुपचं सुदुढ होते. पण त्याला डायरिया झाला. आणि त्यांच वजन २.५ किलो पर्यन्त कमी झाले. हि खुपचं चिंताजनक गोस्ट होती. त्याला दवाखान्यात भरती केलेही.पण त्या बाळाच्या आई-वडिलांनी मधुनच त्याला घरी आणले. त्यांच्या म्हणन्यानुसार दवाखान्यात निटपणे उपचार झाला नाही. मग घरातच उपचार सुरु केले. मैत्रीच्या स्वयंसेवकांनी त्याला दररोज घरीजावुन काळजी घेतली आणि त्याला बरे केले. बाळ आता ठिक आहे. या मोहिमे दरम्यान अशी अनेक बाळे स्वयंसेवकांच्या तात्काळ मदतीमुळे वाचवता आली.          स्वयंसेवकांना दररोज काही नियमित कामे ठरवुन दिली होती. या मध्ये एकवर्षाखालील बाळांना दररोज बघणे,आजारी असल्यास उपचार करणे,गरोदर स्त्रियांना भेटुन त्यांनी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची यासाठी मार्गदर्शन करणे,कुपोषित बाळांच्या पालकांना भेटुन त्याच्या आजार आणि आहार विषयक मार्गदर्शन करणे अशी कामे ठरवली होती.धडक मोहिमेसंदर्भातील आकडेवारी खालीलप्रमाणे,·         धडक मोहिमेतील गावांची संख्या-८·         दवाखान्यात भरती करण्यात आलेल्या गंभीर रुग्णांची संख्या-२० (या मध्ये विशेषत: महिला आणि मुले यांचा समावेश आहे.·         दररोज भेटी करण्यात आलेल्या गरोदर स्त्रियांची संख्या-५१·         एकुन तीव्र आणि मध्यम कुपोषित मुले-१५३काही निष्कर्ष-·         ० ते १ वर्षापर्यंतच्या तसेच कुपोषित एकाही बाळाचा या कालावधी दरम्यान मृत्यू नाही.(१९ जुलै,२०१३ ते ३० सप्टेंबर २०१३)·         २० पेक्षा जास्त रुग्णांना (विशेषत: महिला व मुले) यांना दवाखान्यात भरती करण्यात आले.·         पथनाटयाद्वारे आरोग्य शिक्षणाचे महत्व पटवुन देण्याचा प्रयत्न.·         शासकीय यंत्रणा कुठेच काम करताना दिसली नाही.(अपवाद वगळता)·         महाराष्टातील ८८ स्वयंसेवक स्वखर्चाने या मोहिमेत सहभागी झाले.·         गावांमध्ये दररोज ४० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले.



No comments:

Post a Comment